राष्ट्रीय कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नागद येथे इंडक्शन प्रोग्राम संपन्न
महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता, प्रेरण कार्यक्रम (इंडक्शन प्रोग्राम) संपन्न झाला .कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेज चे मा. प्राचार्य बाळकृष्ण साळवे यांच्या हस्ते करणात आले .प्रा. दिलीप चव्हाण सर यांनी महाविद्यालाने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे विश्लेषण केले व प्रेरण कार्यक्रम आयोजनाचा उद्देश सांगितला .विद्यार्थ्यांना शिक्षणाकरीता उपयुक्त वातावरण निर्माण करणे, त्यांच्या शैक्षणिक आवडी आणि उपक्रमांना प्रोत्साहन देणे ,शिक्षकांमध्ये नातेसंबंध निर्माण करणे, एक निरोगी दैनंदिनी तसेच, एकमेकात प्रेम संघभावना,आत्मविश्वासाची भावना, संवेदनशीलता आणि स्वत: ची समज विकसित करून स्वयंम प्रेरना तयार करणे व सार्वत्रिक मानवी मूल्ये वाढी करता मार्गदशन हा कार्यक्रमाचा उद्देश होता.
प्रेरण कार्यक्रम (इंडक्शन प्रोग्राम) चे प्रमुख पाहुणे , राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेज चे मा. प्राचार्य बाळकृष्ण साळवे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना स्वयंप्रेरणेने उदिष्ठ साध्य करणेकरिता मेहनत करण्याकरिता प्रेरित केले. अभ्यासात सातत्य ठेवून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे व एक चांगले व्यक्तीमत्व म्हणून नवनवीन उपक्रम हाती घेऊन राष्ट्र बांधणीच्या कार्यात हातभार लावण्याचे आवाहन केले.याप्रसंगी त्यांनी राष्ट्रीय कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या कोड ओफ कंडक्ट, कल्चर आणि ट्रॅडीशन बद्दल विद्यार्थ्यांना संबोधले.
या प्रसंगी सर्व विभागप्रमुखांनी प्रा.राकेश मोरे, प्रा.डाॅ जयदीप ससाने, प्रा. डॉ राहुल बोरसे प्रा. सचिन बेलदार प्रा.परशुराम गोपाळ प्रा.राहुल कुमावत, प्रा.योगेश जगताप शाखानिहाय महाविद्यालयातील प्रत्येक शाखेचे महत्व विषद करून प्रत्येक शाखेकरीता महाविद्यालयात असलेल्या सुविधाबाबत मार्गदर्शन व सादरीकरण केले.महाविद्यालयाचे परीक्षा अधिकारी प्रा.राकेश मोरे यांनी पदवी च्या परीक्षेसंबंधी नियम, परीक्षा अर्ज भरणे साठी मार्गदर्शक तत्त्वे व ग्रेड सिस्टम बाबत मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्रबंधक श्री.दिनेश पाटील सर व त्यांचे सहयोगी यांनी विद्यार्थ्यांना प्रशासकीय कामकाजात येणाऱ्या अडचणींबाबत प्रवेश प्रक्रिया,शिष्यवृत्ती, महाडीबीटी, आयकार्ड, बोनाफाईड, इतर प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले.प्रभारी ग्रंथपाल प्रा.परशुराम गोपाळ यांनी महाविद्यालयात असलेल्या ग्रंथ संपदेच्या उपलब्धतेबाबत तसेच ऑनलाइन ई.बुक्स, स्पर्धापरीक्षा बाबत उपलब्ध सुविधा,ग्रंथालयाचे नियम याबाबत मार्गदर्शन केले.या
कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव मा.अर्जुन नितीन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला..